लेख

  • मी गणपती बाप्पाला आशीर्वाद देऊ शकते का?
    माझ्याच जन्मभूमीतली माझ्याच अंगणामधली दक्षिण भारतातली देवळे मी ह्या उभ्या ६३ वर्षांच्या आयुष्यात कधी बघितली नव्हती. शेवटी एकदाचा मुहूर्त लागला. आणि, अक्षरशः माझ्या स्वप्नांच्या पलीकडल्या प्रवासाला सुरुवात झाली.
  • “साही विवाद करीता पडिलो प्रवाही”
    “चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडलो प्रवाही” हे जे दोन चरण आहेत ते अगदी ठेक्यात जगभर सगळ्या घरांमध्ये, टीव्ही वर, प्रचलित गाण्यांमध्ये अगदी जोरात म्हंटले जातात. त्यामागची आख्यायिका (म्हणजे गोष्ट) सांगण्यासाठी हा लेख!
  • मोगऱ्याची फुले
    ही अतिशय अवघड वेळ आहे. सुरेश भटांची रोमँटिक गाणी परत तुझ्या मनात डोकावायला लागतील. त्यांना चार शिव्या हाण. बायकोसमोर मग्रुरी टिकवायलाच हवी.
  • मी ॲपेलेशिअन ट्रेलकडून काय शिकलो?
    ॲपेलेशिअन ट्रेल ही २,२०० मैलांची पायवाट अमेरिकेच्या पूर्वेकडच्या १४ राज्यांमधल्या डोंगरांतून जाते. १० लाख फुटांचा चढउतार असलेली ही पायवाट चक्क बहुतेक देशांपेक्षाही लांबलचक आहे. ही पायवाट सलग ६-७ महिन्यात पार करण्याचा माझा प्रयत्न बऱ्याच निरनिराळ्या शारीरिक दुखापतींमुळे ह्या वर्षीतरी यशस्वी झाला नाही. पण मी जे काही ३३४ मैल चाललो, त्यात शिकलेल्या गोष्टींची ही गम्मत जम्मत!
  • माझे अनुभव
    आपण असं करू या. हे प्रत्येक अनुभवाचं लांबलचक कीर्तन ऐकून तुम्ही कंटाळण्यापेक्षा मी एकदोन वाक्यात माझे अनुभव फटाफट सांगत जातो. त्या अनुभवांच्या मागच्या सुरस गोष्टींचा तुम्हीच नंतर विचार करा.
  • कॅरम टूर्नामेंट
    मी रोज शुद्ध तुपाचा दिवा लावीन. दर weekend ला सकाळी पूजा करीन. आदल्या आठवड्याचं तुझ्या कपाळावरच सुकलेलं गंध सुद्धा पुशीन. इमानदारीत नमस्कार करीन. आजच्या जमान्यात ह्यापेक्षा अजून मी तरी काय करणार?
  • जीवाचा आकांत
    त्याचं काय आहे, जंगलात पक्षी आणि प्राणी बघायला जायचं हा नुसता छंद नाही आहे, तर ती एक झिंग आहे. जबरदस्त नशा आहे.
  • अंडरवेअर
    मग अचानक ट्यूब पेटली. पँट पोटाला कचकचून बांधलेली नसणार. ती ढिली असली की माझा आत्मविश्वास लगेच कमी होतो.
  • घोडा, नाकतोडा आणि मुंग्यांची अंडी
    माझ्या खादाडीचा प्रवास अर्थातच माझ्या आईच्या आणि आजीच्या कुशीत सुरु झाला. कोंड्याचा मांडा करून साध्या साध्या खाण्याच्या गोष्टी अफलातून बनवण्यात त्या पटाईत होत्या.
  • फुलांना छान छान रंग का असतात?
    मला अचानक मार्क ट्वेनचे शब्द आठवले. “I was smart. But then I went to school”. ह्याचा सोपा मराठी अर्थ असा की “मी आधी खूप हुशार होतो. पण झक मारली आणि शाळेत गेलो. त्यात माझं वाटोळं झालं.”